रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोणावळा नगरपालिका शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धा

लोणावळा : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून लोणावळा नगरपालिका शाळेमध्ये लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या वतीने चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या कल्पकतेतून रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवास याविषयी विविध संदेश चित्रकलेतून व निबंधातून सादर केले.या कार्यक्रमाला वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे महत्व पटवून देत ते कसे पाळावेत याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.हा उपक्रम शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरला. लोणावळा पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें