लोणावळा : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगारीविरोधात आणि महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जाण्याच्या निषेधार्थ पुण्यातील लाल महाल येथून मुंबई विधानभवनावर घेराव घालण्यासाठी निघालेल्या “युवा आक्रोश पदयात्रे”चे लोणावळ्यात भव्य स्वागत करण्यात आले.



लोणावळा शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, नगरसेवक निखिल धनंजय कविश्वर यांच्या नेतृत्वाखाली मॅप्रो गार्डन ते खंडाळा दरम्यान ही स्वागत यात्रा पार पडली. यावेळी लोणावळा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष फिरोज बागवान एन.एस.यू.आय. शहराध्यक्ष ॲड. शुभम जोशी, माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष संजय तळेकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश बालगुडे, एन.एस.यू.आय.चे उपाध्यक्ष प्रसाद घोडके, लोणावळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, माजी उपनगराध्यक्षा संध्याताई खंडेलवाल, माजी नगरसेवक सुबोध खंडेलवाल आणि अन्य अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या पदयात्रेच्या माध्यमातून झोपलेल्या महायुती सरकारला जाग आणणे आणि बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देणे, तसेच महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जाऊ नये, हा संदेश देण्यात आला.



