MPN Marathi

लोणावळा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त कॅश काउंटरची मागणी

LONAVLA NEWS – लोणावळा शहर शिवसेनेने लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 01 आणि 03 मधील तिकीट घरात अतिरिक्त कॅश काउंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील तिकीट घरांमध्ये प्रत्येकी एकच कॅश काउंटर आणि यूपीआय काउंटर आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येकी दोन कॅश काउंटर आणि एक यूपीआय काउंटर सुरू करण्याची विनंती शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन मा. मंडल रेल प्रबंधक (वाणिज्य), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, सल्लागार पराग राणे आणि विभागप्रमुख प्रसाद कन्नन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें