KAMSHET NEWS : सह्याद्री विद्यार्थी अकादमी, मावळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती एक आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून साजरी करण्यात आली. वाडीवळे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या लहान मुलांसाठी खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वितरण, तसेच स्थानिक शाळेला फळा (बोर्ड), सतरंजी व इतर शैक्षणिक साहित्य देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.या उपक्रमाद्वारे वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार डाकवे व चेतन वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रुपाली कटके यांनी मानले.
या प्रसंगी सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे सहदेव केदारी, तेजस वाघवले, सचिन शेडगे, अनिश शर्मा, अंकुश काटकर, सचिन गायकवाड, किशोर वाघमारे, निकिलेश दौंडे, प्रसन्न पार्टे, अमोल तिकोणे, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब जमादार, वैभव हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.



