तळेगाव, पुणे – सीआरपीएफ गट केंद्र, तळेगाव (पुणे) येथे विविध दुकाने भाडे तत्वावर देण्यात येणार असून यासाठी पात्र व इच्छुक व्यावसायिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या निविदा प्रक्रियेअंतर्गत, विविध प्रकारची दुकाने ठराविक भाड्यावर देण्यात येणार असून त्यासाठी अर्जदारांनी काही आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज 7 मे 2025 पर्यंत सादर करावेत.
या निविदेअंतर्गत स्नॅक्स सेंटर, मेडिकल शॉप, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स, बेकरी, डेअरी, स्टेशनरी, शालेय गणवेश, कपडे, टेलरिंग, क्रीडा साहित्य, टीव्ही केबल सेवा, वॉटर प्लांट, लॉन्ड्री, सायकल व वाहन दुरुस्ती आदी दुकाने उपलब्ध आहेत. दुकानांसाठी किमान भाडे दर व किमान मासिक वर्गणी खालीलप्रमाणे आहे.
दुकानांचा तपशील:

आवश्यक कागदपत्रे व अटी:
आधार कार्ड, पॅन कार्ड, दुकान चालवण्याची परवानगी/नोंदणी
विक्रीदरात MRP वर सूट असल्यास त्याचे विवरण
सर्व विक्री GST बिलासह करावी लागेल
खाद्यपदार्थांसाठी FSSAI लायसन्स व औषध विक्रीसाठी ड्रग लायसन्स अनिवार्य
पोलीस/ग्रामपंचायत सत्यापन अनिवार्य
कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास दुकान त्वरित रद्द केले जाईल
सर्व अर्जांचे मूल्यांकन भाडे व वर्गणीच्या सर्वोच्च बोलीच्या आधारे होईल
तीन महिन्यांचे भाडे व वर्गणी सुरक्षारक्कम म्हणून जमा करावी लागेल
प्रशासन कारणास्तव निविदा रद्द केली जाऊ शकते
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 मे 2025 असून, अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.



