MPN Marathi

पुण्यात पालखी सोहळ्यात शिवसेनेचा सहभाग; विविध उपक्रमांची आकर्षक आयोजन

पुणे – आज पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे तसेच संपर्कप्रमुख प्रशांत बधे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, अन्नदान व रेनकोट वाटप यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. हे उपक्रम शिवसेना कार्यकर्ते सचिन चिंचवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. पावसाच्या पार्श्वभूमीवर रेनकोट वाटप उपक्रम विशेष उपयुक्त ठरला. हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला.

वारकऱ्यांची सेवा ही आमची जबाबदारी मानून शिवसेनेने अत्यंत समर्पित भावनेने या सेवा दिल्या. यावेळी वातावरण भक्तिभावाने भरलेले होते. पालखी सोहळा शांततेत आणि भाविकांच्या उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें