लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे लोणावळा नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण 2025 अंतर्गत सुपर स्वच्छता लीग गटामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगरपरिषद प्रशासनाचा गौरव करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी अशोक साबळे आणि बांधकाम विभागाचे साठे साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व नागरिकांच्या सहभागाच्या माध्यमातून मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
त्याचप्रमाणे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लोणावळा रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) प्रकल्पाला गती मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या सहायक रचनाकार अतुल केंद्रे आणि रचनाकार सहाय्यक नितेश कदम यांचा देखील पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भूसंपादन, तांत्रिक अडचणी व इतर प्रक्रियांमध्ये अडथळे दूर करून या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत त्यांनी मोठा वाटा उचलल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामांमध्ये योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



