कामशेत रेल्वे स्टेशनजवळ नागरिकाचा जीव वाचविण्यात यश

कामशेत : कामशेत रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या प्रसंगात स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. रात्री साडेआठ वाजता खडकाळे ग्रामपंचायतीच्या जुन्या पंपाच्या मागील बाजूसून मदतीसाठी आरडाओरड ऐकू आली. आवाज ऐकून राजेश ढगे यांनी धाव घेतली असता, इंद्रायणी नदीत एक व्यक्ती कठड्याला धरून उभा असल्याचे दिसले.

ढगे यांनी तात्काळ कामशेत पोलिस स्टेशनला संपर्क केला. तत्परतेने रोशन शिंदे, बंटी शिंगारे, संदेश पायगुडे व इतर नागरिक घटनास्थळी पोहोचले. सर्वांच्या मदतीने त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या कार्यात पोलीस कॉन्स्टेबल निंबाळकर व इतर पोलीस बांधवांनीही मोलाचे सहकार्य केले.

नागरिकांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें