इंदोरी – वराळे, आंबी, वारंवाडी आणि गोळेवाडी परिसरातील गणपती मंडळ भेटीच्या दौऱ्यात आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दादांचे आगमन रंगतदार झाले.
गावागावांतील वाड्या-वस्त्यांवर महिलांनी रांगोळ्यांनी स्वागताचा शुभसंदेश रेखाटला, तर युवकांनी “प्रशांत दादा भागवत यांचा विजय असो” अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.
यावेळी संतोष जांभुळकर, रवी कडलक, नवनाथ पडवळ, अतुल मराठे, शशिकांत शिंदे, कल्पेश मराठे, प्रवीण वारिंगे, गौरव लोंढे, भरत घोजगे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, निलेश लोंढे, बाबासाहेब मखामले, बाळासाहेब मखामले, स्वप्निल भुजबळ, शरद भोंगाडे, संतोष मराठे, शिवा मराठे व संजय मखामले आदी मान्यवर उपस्थित होते.
गावकऱ्यांनी यावेळी, “गावोगावांच्या विकासासाठी दादा म्हणजे विश्वासार्ह नेतृत्व” असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक ठरत आहे. या दौऱ्यामुळे नव्या राजकीय पर्वाची सुरूवात होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.



