इंदोरी : सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे गावागावांत लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेने प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास असा आगळावेगळा उपक्रम सुरू होत आहे.
“मनोरंजन संध्या २०२५” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात महिलांसाठी हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा रंगतदार कार्यक्रमांचा मेळा रंगणार आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी गोळेवाडी (विठ्ठल-रुख्मिणी मंदिर) येथे या उपक्रमाचा भव्य शुभारंभ होणार असून तब्बल नऊ गावांमध्ये हा सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
२२ सप्टेंबर – गोळेवाडी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२३ सप्टेंबर – वारंगवाडी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२४ सप्टेंबर – आंबी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२७ सप्टेंबर – जांभुळ (भैरवनाथ मंदिर)
२८ सप्टेंबर – वराळे (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
२९ सप्टेंबर – मोहितेवाडी (मारुती मंदिरा समोर)
३० सप्टेंबर – समता कॉलनी
१ ऑक्टोबर – साते (दत्त मंदिरा समोर)
६ ऑक्टोबर – भीमाशंकर कॉलनी
सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरू होतील. या सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकप्रिय प्रणालीताई बधाले करणार आहेत. विशेष म्हणजे – प्रत्येक सहभागी महिलेला आयोजकांतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
गावोगावी सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला नवी दिशा देण्याचे कार्य प्रशांतदादा भागवत सतत करीत असतात. महिलांमध्ये आनंद, उत्साह आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारा हा उपक्रम त्याच ध्येयाचा एक भाग आहे.
“हा सोहळा तुमचाच आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि आपल्या उत्साहामुळे कार्यक्रमाची शोभा वाढवा,” असे आवाहन प्रशांतदादा भागवत यांनी महिला-भगिनींना केले आहे.



