लोणावळा शहर व ग्रामीण बुथ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड

लोणावळा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम करणारे श्री. अमोल सुरेश केदारी यांची लोणावळा शहर व ग्रामीण बुथ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

२०१६–१७ मधील जिल्हा परिषद तसेच लोणावळा नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा ठसा उमटविला होता. यासोबतच ग्रामपंचायतींमध्ये बुथनिहाय केलेले संघटनात्मक कार्य आणि व्यापक जनसंपर्क यांचा विचार करून त्यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तालुक्याचे आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांचे निकटवर्तीय तसेच तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या केदारी यांच्यावर आगामी लोणावळा नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या वेळी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संचालक भरत येवले, किरण हुलावळे, ठेकेदार संघाचे अध्यक्ष सुरेश कडु, संतोष राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें