लोणावळा – मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना थेरगाव येथे शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे भांगरवाडी सह लोणावळा शहर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात शिस्तबद्ध वाहतूक, गुन्हेगारीवर नियंत्रण व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या घटना रोखण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार फंडातून या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करून लोणावळा शहरात सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. श्री. बारणे यांनी निवेदनाचा सकारात्मक विचार करून लवकरच यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळून लोणावळा शहर व परिसरातील कायदा-सुव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.



