मावळ (प्रतिनिधी): मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार मा. सुनीलआण्णा शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील वराळे गावात हास्याचा महोत्सव रंगणार आहे. ‘जल्लोष – चांडाळ चौकडीच्या करामतीचा’ हा धमाल विनोदी कार्यक्रम येत्या शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता जुने तलाठी कार्यालय, वराळे फाटा (ता. मावळ, जि. पुणे) येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत सौ. पल्लवीताई संपत दाभाडे (मा. सरपंच, माळवाडी ग्रामपंचायत) व श्री. संपत उर्फ संदीप दाभाडे (युवा नेते, उद्योजक). त्यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील महिला, भगिनी आणि ग्रामस्थांसाठी हा आनंदमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत या विशेष कार्यक्रमात ‘चांडाळ चौकडी’च्या करामतींमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार आहेत. महिलांसाठी खास भव्य लकी ड्रॉ आणि आकर्षक भेटवस्तूंचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यात इलेक्ट्रिक गाडी, फ्रिज, LED टीव्ही, कुलर, ओव्हन मशीन अशा बक्षिसांचा समावेश असून प्रत्येक सहभागी महिलेला एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या जल्लोषमय संध्याकाळी उपस्थित राहून हसत-खेळत, आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आयोजकांनी सर्व मावळकरांना अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



