कार्ला : युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या पुढाकाराने आयोजित “भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२५” या उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीतदादा श्रीरंगआप्पा बारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेत कार्ला गावातील अनेक विद्यार्थी आणि युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या माध्यमातून शिवकालीन वैभव, पराक्रम आणि संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची उजळणी करत नव्या पिढीत अभिमान आणि प्रेरणेची भावना जागविण्याचा या उपक्रमातून सुंदर प्रयत्न झाला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक विठ्ठल रुक्मिणी तरुण मंडळ, द्वितीय क्रमांक शुभम जंगम आणि शिवशंकर तरुण मंडळ (संयुक्त), तर तृतीय क्रमांक आर्यन कचरे आणि धवल जाधव (संयुक्त) यांनी पटकावला. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास मा. ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे, भाजपा विद्यार्थी आघाडीचे माजी अध्यक्ष समीर हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सतीश मोरे, शिवसेना विभागप्रमुख सहादू बडेकर, तसेच मंगेश हुलावळे, प्रशांत ढाकोळ, संजय हुलावळे, माऊली हुलावळे, भावेश हुलावळे, वेद हुलावळे, तीर्थराज हुलावळे, लोकेश हुलावळे, अभिनव दळवी आणि गौरव जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विशाल भाऊसाहेब हुलावळे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय हुलावळे सर यांनी केले.












