लोणावळा : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनाई गावात मातंग समाजातील तरुणावर झालेल्या अमानुष मारहाण आणि समाजावर झालेल्या शिवीगाळ प्रकरणाचा लोणावळा येथे तीव्र निषेध करण्यात आला. लोणावळा शहरातील मातंग समाजाच्या वतीने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
या वेळी मातंग समाज अध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात आला. उपाध्यक्ष विकास साठे, कार्याध्यक्ष विजय साबळे, कृष्णा साबळे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “जय लहुजी, जय अण्णा!” अशा घोषणा देत समाजबांधवांनी एकजुटीने निषेध नोंदविला.
या वेळी उपस्थितांमध्ये ज्येष्ठ नेते नाना रोकडे, अशोक बोभाटे, नामदेव खवळे, दयानंद कांबळे, अभय लोंढे, अभिजीत फासगे, जय पाटोळे, आनंद बोबडे, संदीप बोभाटे, आकाश लोंढे, विनोद साबळे, सुधीर साबळे, विकास साबळे, उदय बोभाटे, वैभव लोंढे, हार्दिक लोंढे, सुचित पवार, केतन लोंढे, सनी घोरपडे, राहुल साठे आणि अनिकेत साठे यांचा समावेश होता. मातंग समाज महिला मंडळ, सिद्धार्थ नगर बौद्धजन सेवा संघ, तसेच आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने या निषेधास जाहीर पाठिंबा देण्यात आला.












