भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी प्रशांतदादा भागवत युवामंचकडून बस व्यवस्था; इंदोरी–वराळे गटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. याच पार्श्वभूमीवर शौर्यदिनाच्या निमित्ताने इंदोरी–वराळे गटातील नागरिकांसाठी श्री. प्रशांतदादा भागवत युवामंच यांच्या वतीने विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे परिसरातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शौर्यदिनाचा ऐतिहासिक सोहळा अनुभवला.
या वेळी मा. श्री. प्रशांतदादा भागवत व सौ. मेघाताई भागवत यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. शौर्यदिनाचे ऐतिहासिक महत्त्व, सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज यावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटातून इच्छुक उमेदवार असलेल्या मेघाताई भागवत यांना गावपातळीवरून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून, त्यांच्या कार्यपद्धतीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
आदिवासी बांधवांसाठी शौचालय उभारणीसारखी ठोस विकासकामे, महिला व सर्व समाजघटकांसाठी केलेले सामाजिक उपक्रम यामुळे मेघाताई भागवत यांची जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. लोकांशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे इंदोरी–वराळे गटाच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व उपयुक्त ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें