
इंदोरीत वारकरी संप्रदायाचा भक्तिमय कीर्तन सोहळा
मावळ तालुक्यातील इंदोरी परिसरात वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. ‘पायी पालखी सोहळा २०२५’ निमित्ताने बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदोरी बायपास येथील प्रशांत पेट्रोलियम शेजारी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मान्यवर संत आणि कलाकार उपस्थित राहणार असून,








