मावळ

ई-पेपर

इंदोरी- वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान जल्लोषात स्वागत मावळ तालुक्यातील विविध वाड्यावस्त्यांवर जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांचा दौरा उत्साहात सुरू आहे. राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी आणि ब्राह्मणवाडी या गावांमध्ये गणेश मंडळांच्या भेटीला गेल्यावर ग्रामस्थांनी आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचासह प्रशांत दादांचे जोरदार स्वागत केले. गावागावात फटाके फोडून आणि जल्लोषात

Read More »
ई-पेपर

सांगवीत “मनोरंजन संध्या 2025” ला उत्स्फूर्त प्रतिसाद – महिलांचा जोश, ग्रामस्थांची एकजूट!

सांगवी – सांगवी ग्रामस्थ आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “मनोरंजन संध्या 2025” हा सांस्कृतिक सोहळा जल्लोषात पार पडला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमात पारंपरिक उखाणे, प्रश्नमंजुषा, हास्यस्पर्धा, मजेशीर खेळ आणि धमाल गप्पांचा समावेश होता. महिलांच्या या उत्साही सहभागामुळे संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. मान्यवरांची उपस्थिती मा. सरपंच सौ. मनीषाताई

Read More »
तळेगाव दाभाडे

आमची गौराई… आमचा अभिमान!प्रशांतदादा भागवत युवा मंचतर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा – गावोगावी उत्साहाचा माहोल

इंदोरी – गणेशोत्सव व गौरीपूजनाच्या पारंपरिक सणाला नव्या उत्साहाची जोड देण्यासाठी प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.“आमची गौराई… आमचा अभिमान!” या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गावोगावी सजावट व सर्जनशीलतेला नवी झळाळी लाभत आहे. आकर्षक बक्षिसांची मेजवानी या स्पर्धेत विजेत्यांसाठी खास बक्षिसे ठेवण्यात

Read More »
ई-पेपर

प्रशांत दादा भागवत यांच्या गणेशोत्सव भेटी दौऱ्याला नऊलाख उंब्रे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नऊलाख उंब्रे (मावळ): आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखाली नऊलाख उंब्रे गावातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यात आली. या भेटी दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी, महिलांनी व युवकांनी दादांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या दौऱ्यात विशेष आकर्षण ठरले ते कांगाई तरुण मंडळाचे साकडे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाच्या चरणी प्रशांत

Read More »
ई-पेपर

जवळपास उद्ध्वस्त झालेले २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न ‘महारेरा’मुळे साकार!

महाराष्ट्रात ‘महारेरा’चा ऐतिहासिक हस्तक्षेप – उध्वस्त झालेला गृहप्रकल्प पूर्णत्वास!

तळेगाव, प्रतिनिधी : काही वर्षांपूर्वी डीएसके साम्राज्यासह कोसळलेला तळेगावातील “डीएसके पलाश-सदाफुली गृहप्रकल्प” अखेर पूर्णत्वास जाऊन २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. ‘महारेरा’च्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे आणि कायद्याच्या बळावर हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. महाराष्ट्रात अशा प्रकारे ‘महारेरा’च्या मध्यस्थीने नवीन बांधकाम व्यावसायिक नेमून प्रकल्प पूर्ण झाल्याची ही पहिलीच यशस्वी घटना आहे. एकेकाळचे नामवंत बांधकाम व्यावसायिक डी.

Read More »
ताज्या बातम्या

वडगाव मावळात कुख्यात गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई

वडगाव मावळ : वडगाव मावळ परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड किरण एकनाथ मोहिते आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे. दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात किरण मोहिते व

Read More »
ई-पेपर

लोणावळा शहर पोलिसांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च

लोणावळा : गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी लोणावळा शहर पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला. पर्यटन नगरीतील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये तसेच अवांछित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.

Read More »
ई-पेपर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना धनुर्वात लसीकरण

तळेगाव दाभाडे : नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडले. या उपक्रमात रोटरी क्लबचे सदस्य श्रीशैल मेंथे, प्रमोद दाभाडे, प्रसाद मुंगी तसेच डॉ. वर्षा वाडकर

Read More »
ई-पेपर

नेपाळी समाज मंडळ लोणावळा तर्फे हरितालीका तिज उत्साहात साजरी

लोणावळा : नेपाळी समाज मंडळ, लोणावळा यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे हरितालीका तिज निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम माऊली मंगल कार्यालय येथे दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला लोणावळ्याचे कर्तव्यनिष्ठ व जनसेवक नगरसेवक देविदासभाऊ कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत (दादा) धुमाळ, मंगेश देशपांडे व शिळीमचे सरपंच

Read More »
ई-पेपर

लोणावळा शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे मंगळागौर सोहळा उत्साहात साजरा

लोणावळा : शिवसेना महिला आघाडी लोणावळा शहर यांच्या वतीने पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन शहरातील कुमार रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला लोणावळा शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमास प. शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, शहर समन्वयक नंदूभाऊ कडू, युवासेना शहराध्यक्ष विवेक भांगरे,

Read More »