
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ आयोजित वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबिराची उत्साहात सांगता
तळेगाव दाभाडे : वारकऱ्यांमध्ये देव, देश, धर्म याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी तसेच नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर १९ व २० ऑगस्ट २०२५ रोजी ओम रेस्टॉरंट, वेहेरगाव-दहिवली (ता. मावळ, जि. पुणे) येथे पार पडले. मंडळाचे