मावळ

ताज्या बातम्या

देहूरोड रेल्वे स्थानकावर आत्मदहनाचा प्रयत्न; आंदोलन उग्र

देहूरोड – कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी देहूरोड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने देहूरोड रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी महिलावेशात येत चालत्या रेल्वेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले आणि संभाव्य अनर्थ टाळला. या वेळी आंदोलकांनी सह्याद्री एक्सप्रेस अथवा

Read More »
ताज्या बातम्या

पवनानगर : मावळातील टाकवे खुर्द गावातील पंकज पिंपरेने अवघ्या २२ व्या वर्षी पूर्ण केले चार्टर्ड अकौंटंटचं स्वप्न!

मावळ तालुक्यातील कार्ला शेजारी असलेल्या टाकवे खुर्द या लहानशा खेड्यातील पंकज बाळासाहेब पिंपरे याने नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात चार्टर्ड अकौंटंट (CA) ची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, त्याने हे यश अवघ्या २२ व्या वर्षी मिळवलं आहे. पंकजची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील व्यवसायाने रिक्षाचालक असून, मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला पंकजने

Read More »
गुन्हा

पवना धरण परिसरात दारूच्या नशेत मित्राचा खून

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणालगतच्या ठाकूरसाई भागात एका व्हिला बंगल्यातील माळीच्या खोलीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे नाव दिनेश लक्ष्मण गरवड (वय ३६, रा. भाजे, ता. मावळ) असे आहे. त्याच्या भावाच्या तक्रारीवरून प्रणव

Read More »
मनसे

लोणावळ्यात मनसेचा शिक्षणासाठी लढा; विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

लोणावळा शहरातील मनसेने सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावत धडाकेबाज कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट प्रसिद्ध करत, विद्यार्थ्यांची फी न भरल्याने होणाऱ्या अडवणुकीवर कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कुसगाव बु. येथील श्री. जगन्नाथ कांबळे यांनी मनसे अध्यक्ष निखिल भोसले यांच्याशी संपर्क साधून, “किंग्जवे शाळेने माझ्या तीन मुलांचे दाखले 53,000 रुपयांची फी थकीत

Read More »
Uncategorized

ओला-उबेर बंदीबाबत आमदार शेळके यांची भूमिका ठाम; टॅक्सी चालक संघटनेचे आभार

लोणावळा, 21 जून – लोणावळा-खंडाळा टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशनने ओला-उबेर अ‍ॅप विरोधात पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांचे विशेष आभार मानले आहेत. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून आमदार शेळके यांनी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ओला-उबेर बंद करण्यासाठी

Read More »
कामशेत

विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम कामशेत कान्हे येथे

सस्नेह नमस्कार,कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने “दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम” शनिवार, दि. १४ जून रोजी सकाळी १० वाजता साई सेवाधाम, कान्हे कामशेत येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More »
कामशेत

कामशेतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन संपन्न

कामशेत : कामशेत ही ७० गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार (दि.०६) शिवस्मारकाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील विविध गावांतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात,

Read More »
कामशेत

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना; कार्यकारिणी जाहीर

कामशेत : मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या एकत्रित हितासाठी आणि ग्रामीण पत्रकारितेचा विकास साधण्यासाठी कामशेत येथे ‘कामशेत ग्रामीण पत्रकार संघ’ या नवीन पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघाच्या स्थापनेसोबतच २०२५-२०२६ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.संघाचे अध्यक्षपद चेतन वाघमारे यांच्याकडे देण्यात आले असून, उपाध्यक्ष म्हणून सुभाष भोते, सचिव प्रफुल्ल ओव्हाळ, तर खजिनदार

Read More »
तळेगाव दाभाडे

पै. सचिन भाऊ शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षेतील उत्तुंग यश – सलग नवव्या वर्षी 100% निकाल

मावळ: पै. सचिन भाऊ शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कूलने यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत सलग नवव्या वर्षी 100% निकालाची नोंद केली आहे. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यंदा एकूण 59 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून 38 विद्यार्थ्यांनी उच्च प्रथम श्रेणीत, 15 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत तर 6 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत

Read More »
तळेगाव दाभाडे

लोणावळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी; महामार्गावर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तीव्र

लोणावळा – पर्यटकांची पसंदि म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात सध्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः जुना मुंबई-पुणे महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, याच मार्गावर वाहनचालक रस्त्यावरच गाड्या पार्क केल्याने कोंडी वाढत चालली आहे. कुमार चौक ते किरण पेट्रोल पंप या दरम्यानचा परिसर विशेषतः  वाहतूक कोंडीसाठी बदनाम झाला आहे. या भागातील

Read More »