
लोणावळा शहर पोलिसांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च
लोणावळा : गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी लोणावळा शहर पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला. पर्यटन नगरीतील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये तसेच अवांछित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.