
मुकाई मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने इंद्रायणी माईच्या सेवेत – पर्यावरण प्रेमींची अनोखी सामाजिक धुरा
इंदोरी– गणपती उत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सण. मात्र विसर्जनानंतर घाटाची झालेली दयनीय अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी यायचं. निर्माल्याचे ढीग, नदीकाठी पडून राहिलेल्या मूर्ती, पसरलेली दुर्गंधी – ज्या बाप्पाची आपण भावपूर्वक पूजा केली, त्याच मूर्तींची अशी अवस्था पाहवत नसे. यामुळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यालाही गालबोट लागत असे. ही वेदना मनाला चटका लावणारी होती.