
पवना धरण परिसरात दारूच्या नशेत मित्राचा खून
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणालगतच्या ठाकूरसाई भागात एका व्हिला बंगल्यातील माळीच्या खोलीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे नाव दिनेश लक्ष्मण गरवड (वय ३६, रा. भाजे, ता. मावळ) असे आहे. त्याच्या भावाच्या तक्रारीवरून प्रणव