
ऊसतोड मजुराने सुरु केला पोल्ट्री फार्म व्यवसाय, 45 दिवसाला 70 हजारांची कमाई
प्रशांत पवार, प्रतिनिधीबीड : दिवसेंदिवस पोल्ट्री फार्म या व्यवसायाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये चांगलाच वाढत आहे. खर तर हा व्यवसाय अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये तुम्ही सुरू करू शकता. पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करत भरपूर लोकांनी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवल्याचे दिसून येत आहे. बीडमधील सय्यद सहमद यांची अशीच कहाणी असून ते पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या माध्यमातून बक्कळ कमाई