
इंदोरीच्या खेळाडूंचा जिल्हास्तरीय प्रवास – प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून दुहेरी विजेतेपदाची मोठी कामगिरी!
इंदोरी – प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशन इंदोरी अर्थात संघर्ष क्रीडा मंडळ व प्रगती विद्या मंदिर इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत इंदोरीच्या खेळाडूंनी विजयी झेंडा फडकावला आहे. या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या संघाचे कर्णधार गणेश अशोक दिवटे तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या संघाचे कर्णधार हरिओम विठ्ठल अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघांनी