
मावळ तालुक्यातील आजीवली शाळेला पर्यावरण संवर्धनाबद्दल सन्मान
पवनानगर : पर्यावरण संवर्धन आणि वाचविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आजीवली यांचा Environment Conservation Association (ECA) तर्फे गौरव करण्यात आला. या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, पर्यावरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय कुलकर्णी तसेच सायन्स पार्कचे व्यवस्थापक श्री. प्रवीण तुपे यांच्या हस्ते शाळेला ट्रॉफी प्रदान करण्यात आली.








