ई-पेपर

ई-पेपर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना धनुर्वात लसीकरण

तळेगाव दाभाडे : नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडले. या उपक्रमात रोटरी क्लबचे सदस्य श्रीशैल मेंथे, प्रमोद दाभाडे, प्रसाद मुंगी तसेच डॉ. वर्षा वाडकर

Read More »
ई-पेपर

नेपाळी समाज मंडळ लोणावळा तर्फे हरितालीका तिज उत्साहात साजरी

लोणावळा : नेपाळी समाज मंडळ, लोणावळा यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे हरितालीका तिज निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम माऊली मंगल कार्यालय येथे दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला लोणावळ्याचे कर्तव्यनिष्ठ व जनसेवक नगरसेवक देविदासभाऊ कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत (दादा) धुमाळ, मंगेश देशपांडे व शिळीमचे सरपंच

Read More »
ई-पेपर

लोणावळा शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे मंगळागौर सोहळा उत्साहात साजरा

लोणावळा : शिवसेना महिला आघाडी लोणावळा शहर यांच्या वतीने पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन शहरातील कुमार रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला लोणावळा शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमास प. शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, शहर समन्वयक नंदूभाऊ कडू, युवासेना शहराध्यक्ष विवेक भांगरे,

Read More »
ई-पेपर

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ आयोजित वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबिराची उत्साहात सांगता

तळेगाव दाभाडे : वारकऱ्यांमध्ये देव, देश, धर्म याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी तसेच नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर १९ व २० ऑगस्ट २०२५ रोजी ओम रेस्टॉरंट, वेहेरगाव-दहिवली (ता. मावळ, जि. पुणे) येथे पार पडले. मंडळाचे

Read More »
ई-पेपर

कामशेत रेल्वे स्टेशनजवळ नागरिकाचा जीव वाचविण्यात यश

कामशेत : कामशेत रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या प्रसंगात स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. रात्री साडेआठ वाजता खडकाळे ग्रामपंचायतीच्या जुन्या पंपाच्या मागील बाजूसून मदतीसाठी आरडाओरड ऐकू आली. आवाज ऐकून राजेश ढगे यांनी धाव घेतली असता, इंद्रायणी नदीत एक व्यक्ती कठड्याला धरून उभा असल्याचे दिसले. ढगे यांनी तात्काळ कामशेत पोलिस स्टेशनला संपर्क

Read More »
ई-पेपर

सोमाटणे टोल अनधिकृत; मनसे ने दिले MSRDC व IRB ला निवेदन

लोणावळा | प्रतिनिधीसोमाटणे टोल नाका हा अनधिकृत असून त्याचे त्वरित स्थलांतर अधिकृत जागेवर करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने सिंहगड कॉलेज परिसरातील एमएसआरडीसी व आयआरबीच्या कार्यालयांना भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि लेखी निवेदन सादर केले. काही दिवसांपूर्वी सोमाटणे टोलनाका अधिकृत आहे की अनधिकृत यासंदर्भात तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये बैठक झाली

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात जयहिंद लोकचळवळतर्फे डिलिव्हरी बॉय (रायडर) साठी भव्य मेळावा

लोणावळा | प्रतिनिधीरोजच्या धावपळीच्या जीवनात घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉय (रायडर्स) यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी जयहिंद लोकचळवळ, लोणावळा यांच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन महिला मंडळ हॉल, हुडको, लोणावळा येथे करण्यात आले. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन जयहिंद लोकचळवळचे संस्थापक श्री. निखिल दादा कविश्वर यांनी केले. यावेळी हाजी अब्बास भाई खान, ऍड. शुभम रविंद्र

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात युवक काँग्रेसच्या “युवा आक्रोश पदयात्रे”चे जल्लोषात स्वागत

लोणावळा : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगारीविरोधात आणि महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जाण्याच्या निषेधार्थ पुण्यातील लाल महाल येथून मुंबई विधानभवनावर घेराव घालण्यासाठी निघालेल्या “युवा आक्रोश पदयात्रे”चे लोणावळ्यात भव्य स्वागत करण्यात आले. लोणावळा शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, नगरसेवक निखिल धनंजय कविश्वर यांच्या नेतृत्वाखाली मॅप्रो गार्डन

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात व्यसनाधीनतेचा धोका? शाळकरी मुलगा टपरीवर पान व तंबाखू विकताना आढळला!

लोणावळा : लोणावळा शहरातील एका महत्त्वाच्या चौकातील टपरीवर एक धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. शाळकरी गणवेशातील एक लहान मुलगा टपरीवर बसून पान बनवत होता आणि ग्राहकांना सिगारेट, तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनसामग्री विकत होता. हा मुलगा कदाचित आपल्या वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या टपरीवर बसला असावा, मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.केवळ काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यात आणखी एक

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन; महिलांसाठी विशेष निमंत्रण

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेचे मा. नगरसेवक श्री. देविदास भाऊसाहेब कडू आणि सौ. सुषमा देविदास कडू यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भाऊसाहेब कुंज, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा येथे संपन्न होणार आहे. हळदीकुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीतील एक पारंपारिक सण असून,

Read More »