
वेंकटेश्वर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
कामशेत : वेंकटेश्वर शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत उत्साहात साजरे करण्यात आले.या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची खास थीम होती “धरोहर”,जी आपल्या सांस्कृतिक वारसाला उजाळा देणारी होती.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक साहिल खत्री,चेअरमन नागेंद्र सोलंकी,मुख्याध्यापिका सॅन्ड्रा चिमा,प्रशासक उपदेश काहलों,इव्हेंट कॉर्डिनेटर ऐश्वर्या जाधव व डान्स कोरिओग्राफर निकिता स्वामी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.








