
काकडा आरती सोहळा निमित्त ग्रामस्थांची भेट आणि आपुलकीचा संवाद ; ज्ञानेश्वर दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची सर्वत्र चर्चा
पवनानगर : मावळ तालुक्यातील काले–कुसगाव जिल्हा परिषद गटात नुकत्याच झालेल्या काकडा आरती सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांशी आपुलकीचा संवाद साधण्यात आला. या दौऱ्यात पंचायत समिती मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांनी विविध गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. धार्मिक आणि सामाजिक वातावरणात पार पडलेल्या या भेटींना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुसगांववाडी येथे झालेल्या आरती व महापूजा कार्यक्रमात








