
प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ
मावळ : सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारे प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ येत्या रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, शिवराज पॅलेस, जांभूळ फाटा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके आणि सौ. सारिकाताई शेळके प्रमुख उपस्थित राहणार