
लोणावळ्यात गरजू महिलांसाठी रोजगाराची संधी, आधार व सफल फाउंडेशनचा पुढाकार
लोणावळा : लोणावळा शहरातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आधार फाउंडेशन आणि सफल फाउंडेशन यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गरजू महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, या संस्थांनी २५ महिलांना गृहउद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री वाटप केली. हा कार्यक्रम २९ जानेवारी रोजी शेडगे हाइट्स, दत्त मंदिरासमोर संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत महिलांना केवळ मशीनच नव्हे, तर त्यावर उत्पादन कसे