
सोमाटणे टोल अनधिकृत; मनसे ने दिले MSRDC व IRB ला निवेदन
लोणावळा | प्रतिनिधीसोमाटणे टोल नाका हा अनधिकृत असून त्याचे त्वरित स्थलांतर अधिकृत जागेवर करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने सिंहगड कॉलेज परिसरातील एमएसआरडीसी व आयआरबीच्या कार्यालयांना भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि लेखी निवेदन सादर केले. काही दिवसांपूर्वी सोमाटणे टोलनाका अधिकृत आहे की अनधिकृत यासंदर्भात तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये बैठक झाली