
परदेशी माणसाचा फोन येतोय, ताई EVM मध्ये गडबड; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नाशिक: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे. परदेशी माणसाचा फोन येतोय, ताई मशीनमध्ये गडबड आहे असं सांगत आहे. बाबतची माहिती आपण निवडणूक आयोगाला देणार असल्याचं सुळेंनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाचा किंवा विरोधातील उमेदवाराची फसवणूक