
ओला-उबेर बंदीबाबत आमदार शेळके यांची भूमिका ठाम; टॅक्सी चालक संघटनेचे आभार
लोणावळा, 21 जून – लोणावळा-खंडाळा टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशनने ओला-उबेर अॅप विरोधात पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांचे विशेष आभार मानले आहेत. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून आमदार शेळके यांनी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ओला-उबेर बंद करण्यासाठी