
ताज्या बातम्या
ओवळे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संतोष साठे बिनविरोध
ओवळे (ता. मावळ) येथे 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. संतोष काशिनाथ साठे यांची बिनविरोध निवड झाली. सुरुवातीला शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते अजित शिंदे यांनी निवडणुकीवर आक्षेप घेत गटविकास अधिकारी श्री. कुलदीप प्रधान यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, सरपंच व ग्रामसेवकांच्या मार्गदर्शनानंतर आणि गावाची बिनविरोध परंपरा जपण्यासाठी त्यांनी माघार घेतली.