
जवळपास उद्ध्वस्त झालेले २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न ‘महारेरा’मुळे साकार!
महाराष्ट्रात ‘महारेरा’चा ऐतिहासिक हस्तक्षेप – उध्वस्त झालेला गृहप्रकल्प पूर्णत्वास!
तळेगाव, प्रतिनिधी : काही वर्षांपूर्वी डीएसके साम्राज्यासह कोसळलेला तळेगावातील “डीएसके पलाश-सदाफुली गृहप्रकल्प” अखेर पूर्णत्वास जाऊन २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. ‘महारेरा’च्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे आणि कायद्याच्या बळावर हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. महाराष्ट्रात अशा प्रकारे ‘महारेरा’च्या मध्यस्थीने नवीन बांधकाम व्यावसायिक नेमून प्रकल्प पूर्ण झाल्याची ही पहिलीच यशस्वी घटना आहे. एकेकाळचे नामवंत बांधकाम व्यावसायिक डी.