
गणेशोत्सव मंडळांना सुरेखाताई जाधव यांचा संवाद दौरा; नगराध्यक्षपदाच्या दावेदारीची चर्चा तेजीत!
लोणावळा: माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या या संवाद दौऱ्यामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या दावेदारीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या दौऱ्यात भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सुरेखाताई यांनी लोणावळ्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे