
लोणावळ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी, खासदार बारणे यांना निवेदन
लोणावळा – मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना थेरगाव येथे शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे भांगरवाडी सह लोणावळा शहर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात शिस्तबद्ध वाहतूक, गुन्हेगारीवर नियंत्रण व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या घटना रोखण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद