
ई-पेपर
खड्डेमय रस्त्याविरोधात तळेगावकरांचे आमरण उपोषण; प्रशांत दादा भागवतांचा जाहीर पाठिंबा
तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर आज मराठा क्रांती चौकात पीडब्ल्यूडी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरील मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून, अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार तक्रारी करूनही विभागाकडून कोणतीही ठोस दुरुस्तीची उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे