
इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात मेघाताई भागवत यांचा संपर्क दौरा जोमात — महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, निवडणुकीच्या रंगतदार लढतीची चाहूल
इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी अलीकडेच गावभेटी व जनसंपर्क दौऱ्याला वेग दिला आहे. प्रत्येक गावात महिलांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, या गटातील निवडणूक अधिकच रंगतदार बनत चालल्याचं स्पष्ट जाणवत आहे. मेघाताई भागवत यांनी थेट जनतेशी संवाद साधत आपली विकासदृष्टी, सामाजिक कार्यातील अनुभव आणि सर्वसमावेशक विचारसरणी प्रभावीपणे मांडली.
