
मावळ
मळवली व आसपासच्या गावात 11 तासांपासून वीज पुरवठा खंडित; महावितरण अधिकाऱ्यांचे फोन बंद, नागरिक संतप्त
कार्ला – मावळ तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मळवली व आसपासच्या गावात तब्बल 11 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज (11 मार्च) सकाळी सुमारे 9 वाजल्यापासून वीज पुरवठा बंद असून रात्री साडेआठ वाजले तरी वीज परत आलेली नाही. त्यामुळे स्थानिक दुकानदार, व्यावसायिक तसेच गृहिणींच्या दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला आहे.मळवली