
कामशेत
मावळ तहसील कार्यालयाकडून समाधान शिबीर; नागरिकांच्या महसुली अडचणींवर होणार जागेवर तोडगा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत मावळ तहसील कार्यालयाच्या वतीने समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर मावळ तालुक्यातील खडकाळा, टाकवे बु. आणि वडेश्वर मंडळातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रकरणे आणि अडचणींवर मार्गदर्शन करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला