
ताज्या बातम्या
LONAVALA NEWS – लोणावळ्यासाठी Revised Development Plan तातडीने तयार करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी
लोणावळा नगरपरिषद हद्दीतील सुधारित विकास आराखडा (Revised Development Plan – DP) तातडीने तयार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) युवक व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार प्रत्येक 20 वर्षांनी विकास आराखड्याचे पुनरावलोकन करणे बंधनकारक आहे. लोणावळा नगरपरिषदेचा विद्यमान विकास आराखडा 2026 मध्ये 20 वर्षांचा पूर्ण