
गुन्हा
वसुली दरम्यान महिला वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की,लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
लोणावळा | दि. १६ मार्च २०२६ :महावितरणच्या वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरण कंपनीकडून पुणे परिमंडलात थकीत वीजबिल वसुली मोहीम सुरू असून सोमवारी (१६ मार्च) दुपारी सुमारे २.१० वाजण्याच्या सुमारास रवी पांगोळी सोसायटी येथे ही घटना घडली. महिला वरिष्ठ तंत्रज्ञ करिश्मा